धार येथील गावठाण जागा राजे क्रिडा संकुल यांना द्यावी; अन्यथा रविंद्र पाटलांचा आत्मदहनाचा इशारा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

धार येथील ग्रामपंचायत धार गावठाण जागा राजे क्रिडा संकुल धार यांना देण्यात यावी, याबाबत माजी उपसरपंच तथा देवा गृप फाऊंडेशन तालुकाध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी सदर निवेदन गटविकासअधिकारी, पं. स, तहसिलदार, अमळनेर पो.स्टे, मा.ए.पी.आय, मारवड पो.स्टे, अमळनेर यांना दिले आहे.

गट नंबर २४५/१. मधील जागा धार येथील राजे क्रिडा संकुल धार यांना देण्यात यावी, याची मागणी मागील २ वर्षापासुन ग्रामसभामध्ये तरुण मित्र मंडळ प्रत्येक ग्रामसभेला हजर असतांना ग्रामसेवक व ग्रामपंचायत ठराव देत नसल्यामुळे त्यांनी हा विषय घेतला असला तरी ग्रामसेवक यांनी आज पर्यंत ग्रामपंचायत धार यांनी ठराव दिला नाही.

तरी १५ ऑगस्ट २०२१ रोजी रविंद्र भगवान पाटील हे सर्व तरुण मित्र मंडळ उपस्थित असतांना ग्रामसेवक आप्पा यांनी ठराव दिला नाही. तरी ३० ऑगस्ट पर्यंत ठराव न दिल्यास पाटील व त्यांचे सहकारी ०१ सप्टेंबर २०११ रोजी पंचायत समिती, अमळनेरच्या समोर आत्महदहन करणार आहे . तरी धार ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. असा तीव्र इशारा रवींद्र पाटील यांनी दिला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.