धानोरा अडीच लाख लुट प्रकरणी आमदारांनी दिले तपास करण्याचे आदेश

0

धानोरा ;- दि २५ रोजी संध्याकाळी पाच च्या सुमारास अडावद च्या बाजार समिती जवळ धानोरा येथिल व्यापाऱ्याचे मुलाचे दोन तरुणांनी अडीच लाख रुपये लुटून नेले.याबाबत आ प्रा चंद्रकात सोनवणे यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश अडावद पोलिसांना दिले.

याबाबत आ सोनवणे यांनी महेंद्र ट्रेडींग कंपनीचे मालक सुरेश सोगालाल चौधरी यांचा मुलगा महेंद्र यांच्या घरी जात सांत्वन केले.घटना जाणुन घेतली.यावेळी तेथुनच त्यांनी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधुन सदर प्रकार निंदणीय असुन व्यापाऱ्यांचे पैसे चोरीला जाताय,सध्या खरीप हंगामाची तयारी,बियाणे खरदिला वेग आला आहे यामुळे स्वतः लक्ष घालुन चोरांच्या मुसक्या आवळा असे सांगीतले.

यावेळी माजी उपसभापती माणिकचंद महाजन,दुध संस्थेचे माजी अध्यक्ष किरण पाटील,शिक्षकसेनेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे,पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे, रविंद्र पाटील,राजेंद्र कोळी,अनिस शेख,भागवत चौधरी,दशरथ चौधरी,अमोल महाजन,हिरालाल गुजर,मोतिलाल पाटील,संदीप चौधरी,दिलीप महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.