धरणगाव तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले

0

धरणगाव (प्रतिनिधी) कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला आहे.  त्यामध्ये तालुक्यात नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
आढळून आले आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.धरणगाव शहरातील ६ तर पाळधी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११८ झाली.

धरणगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण आढळून येत असल्याने विभागाची चितां वाढली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये धरणगाव शहरांमधील हेमइंदू नगरातील ५, परिहार नगर १ तसेच पाळधी गावातील एक असे एकुण सात रूग्ण आढळलेत. सदरील परिसर सील करण्यात येत असून आढळून आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांची माहिती घेण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.