धक्कादायक ; बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला खदानीत

0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तांबापुरा लगत असलेल्या खदानीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात बांधलेला मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केल्याची घटना दि. २० रोजी घडली. 

सोमवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास काही तरुणांना एका मुलीचा ओढणीने हात बांधलेला मृतदेह तांबापुरा जवळ असलेल्या खदानीत दिसून आला. 

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृदेहाची ओळख पटवली. मयत तरुणी आपल्या आईसोबत मागील तीन महिन्यापासून गणपती नगरमध्ये धुणी-भांडी धुण्याचे काम करत होती. रविवारी दि १९ रोजी दुपारी नेहमी प्रमाणे आपल्या आईसोबत मयत तरुणी १२:३० वाजेच्या सुमारास घरातून निघाली. गणपती नगरमध्ये आजुबाजूच्या घरात दोन्ही माय-लेकी कामासाठी गेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी तेथे एक दारूच्या नशेत तरुण आला आणि घर मालकीण बाईला नजमा (नाव बदलेले) घरात आहे का?, अशी विचारपूस करू लागला. घरमालकीण बाईने तीन वेळेस त्या अज्ञात तरुणाला हटकले. परंतू चौथ्यांदा तो तरुण नजमा आपल्या सोबत घेऊन गेला. घरी जाण्याच्या वेळी नजमाच्या आईने विचारपूस केली असता. कोणासोबत तरी नजमा गाडीवर निघून गेल्याचे घरमालकीणबाईने सांगितले. घरी परतल्यावर नजमा कुठेही दिसून येत नव्हती. त्यामुळे रात्री सलमाच्या आईने अपहरणाची फिर्याद रामानंद नगर पोलीस स्थानकात दिली. त्यानंतर आज सकाळी नजमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत तरुणीच्या नातेवाईकांनी हा खून असून ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.