द्राक्षांनी भरलेले वाहन पलटी ; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

0

बोदवड | प्रतिनिधी 

तालुक्यातील वरखेड खुर्द गावाजवळील पुलाजवळ द्राक्षांनी भरलेल्या (बुलेरो पिकअप) वाहना वरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे तीचा अपघात होवून पलटी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी अथवा वाहनाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.सदर वाहन हे नाशिक येथून नांदूरा येथे द्राक्ष घेऊन जात असल्याचे व  वाहनांमध्ये एकुण द्राक्षांनी भरलेल्या ३०० बॉक्स पैकी १५० बॉक्स या अपघातात खराब झाल्याचे यावेळी ड्रायव्हर यांच्याकडून सांगण्यात आले. वाहनाचा अपघात घडल्याचे लक्षात येताच युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील,विष्णू पाटील,अजय पाटील,शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून घटनास्थळी योग्य ते सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.