दोन व्यापार्‍यांकडुन शेतकर्‍यांची 32 लाख रूपयांची फसवणुक

0

भुसावळ :- येथील कृषी ऊत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणार्‍या दोन व्यापार्‍यांनी संगनमत करुन तालुक्यातील जवळपास चाळीस शेतकर्‍यांकडुन खेडा पध्दतीने धान्य खरेदी केले मात्र पैसे न देता फसवणुक केली म्हणुन बाजार पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे तर तालुका पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला आहे.फसवणुकीचा हा आकडा 32 लाखाच्या घरात आहे.

या संदर्भात शेतकर्‍यांनी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना लेखी तक्रार अर्जात नमुद केले आहे की,येथील व्यापारी धनराज आनंदा चौधरी व अशोक आनंदा चौधरी या व्यापार्‍यांनी वेगवेगळ्या चाळीस शेतकर्‍यांकडुन गहु,ज्वारी,हरभरा व ऊडीद असे खेडा खरेदी करुन माल घेतला त्यापोटी काही शेतकर्‍यांना धनादेश दिले तर काहींना कच्च्या पावत्या दिल्या.

हा व्यवहार होऊन तीन महीणे ऊलटले तरी या व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना पैसे दिले नाही.एखाद दुसर्‍या शेतकर्‍याने वकीला मार्फत नोटीस दिली असता ती स्विकारली नाही. फसवणुक झालेल्या चाळीस शेतकर्‍या पैकी एकट्या साकेगाव ता.भुसावळ येथिल चौदा शेतकर्‍यांचा समावेश असुन त्यांची आठ लाखात फसवणुक झाली आहे.सर्व शेतकरी मिळुन हा आकडा 32 लाख रुपयांपर्यंत जातो.

या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे तर तालुक्यातील फसवणुकीचा हा आकडा मोठा असुन तालुका पोलिसात मात्र केवळ तक्रार अर्ज घेऊन संबधीतांना शेतकर्‍यांची रक्कम चुकविण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे.

शेतक-यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देणार- सभापती सचिन चौधरी
फसवणूक करणा-या दोन्ही व्यापा-याविरुद्ध कारवाई करणार असून शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचे पै न पै परत मिळवून देवून त्यांना न्याय देणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनी सांगितले. शेतकरी माझ्याकडे ऊशिरा आले.फसवणुक करणारे दोन्ही व्यापार्‍या विरुध्द कलम 1963 च्या नियम 57 नुसार या व्यापार्‍यांविरुध्द कारवाई सक्त वसुलीची करणार आहे.यार्डात असलेला हा माल सील करण्यात आला असून या दोघांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याचेही सचिन चौधरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.