देशभरातील रेल्वे गाड्या बंद

0

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार कोरोनाचादुष्परिणाम पाहता दि.२२ ते ३१ रोजी रात्री १२ वाजेपासून देशभरातील रेल्वेच्या  संपूर्ण गाड्या पूर्णतः बंद कण्याचा निर्णय घेतला आहे. यात पॅसेंजर, मेल एक्सप्रेस, गाडी, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाईन, दुरंतो एक्सप्रेस, लोकल गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आलया आहे. भुसावळ विभागातून एकही गाडी धावणार नाही. या काळात केवळ मालवाहतूक चालू राहील.

दरम्यान,दि. ३१ मार्च पर्यंत सर्वच रेल्वे गाड्या बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांनी आपले आरक्षित व अनारक्षित तिकिट रद्द करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई करुन नये ही तिकीटे दि.२१ जून पर्यंत आरक्षण तिकिट रद्द करुन पूर्ण रक्कम परत मिळवू शकणार आहे. ऑनलाइन तिकिटांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तिकीटे रद्द करण्यासाठी आरक्षण कार्यालयात घाई करुन नये त्यामुळे आरक्षण कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.