एरंडोल येथे जनता संचारबंदी १००% प्रतिसाद !

0

एरंडोल (प्रतिनिधी) : येथे केंद्र सरकार पुकारलेल्या जनता कर्फ्यू स‌ २२ रोजी १००%  प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या कर्फ्यू चे व्यापारी, व्यवसायिक, विक्रेते, इत्यादी घटक 100% सहभागी झाले. विशेष हे की एरंडोल बस स्थानक परिसरातील काली-पिली गाड्यांचे चालक, ऑटो रिक्षा चालक यांनी सुद्धा सहभाग नोंदवला.याच बरोबर शहरातील दर्गाहवाली मस्जिद मुजावर मोहल्ला यांच्या तर्फे मस्जिदिवर कोरोना आजरा बाबत सातर्कतेचे फलक लावण्यात आले होते.

एकंदरीत जनता संचारबंदी  १०० % यशस्वी  झाली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.तसेच एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

एरंडोल येथे सायंकाळी टाळ्यांचा गजर घंटानाद

एरंडोल कोरोना विषाणू रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी एरंडोल येथे जनता संचारबंदी ला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी शहरवासीयांनी मुलांनी व महिलांनी टाळ्या वाजून गजर केला तर युवक-युवती मुले-मुली यांनी थाड्या वाजून घंटानाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.