दुध भेसळीबाबत ग्राहक पंचायत आवाज उठवणार : विकास महाजन

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवार दि.28 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली.

22, 23, व 24 जून रोजी V C द्वारे झालेल्या राज्य स्तरीय अभ्यास वर्गाची माहिती दिली. एम.आर.पी.द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एम.आर.पी.रदद् करुन आवेष्टीत वस्तूंवर उत्पादन मुल्य छापणेबाबत चर्चा केली . शहर व गांव पातळीवर स्वदेशीचा आग्रह धरणे, प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जावून ग्राहक पंचायतचे कार्य समजावून सांगणे व सदस्य होण्यासाठी प्रबोधन करणे.सदस्य संख्या वाढविणे,
पारोळा तालुक्यातील किमान 10 मोठया गावांमधे शाखा तयार करणे. तालुकास्तरावर अभ्यास वर्गाचे नियोजन करणे, शहरांमधे वार्ड तेथे ग्राहक पंचायत शाखा तयार करणे, खाद्य पदार्थातील भेसळीवर लक्ष देणे. विशेषत: दुधाच्या भेसळीवर, तालुक्यात महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढविणे, प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये कंझुमर क्लब स्थापन करण्यावर भर देणे, युवांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना ग्राहक पंचायतचे महत्व समजावून सांगणे. व त्यांना ग्राहक पंचायतमधे आणून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. युवा ग्राहक पंचायत शाखा तयार करणे.आदी विषयांवर चर्चा झाली.

बैठकीत तालुकाध्यक्ष जगदीश आफ्रे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य Adv. कृतिका आफ्रे, बापू महाजन, अनिल शिंपी, पत्रकार रमेश मामा जैन, संजय पाटील, र.ही.ठाकरे सर, सुधाकर नेतकर, कल्पेश जैन, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.
बैठकीचे नियोजन आणि संचलन कल्पेश जैन यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष जगदीश आफ्रे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.