दिव्यांग सेनेची पाच टक्के निधीसाठी फैजपूर नगरपरीषदेवर धडक

0

 फैजपूर (प्रतिनिधी): सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी फैजपुर दिव्यांग सेनेने दिव्यांग बांधवाना हक्काचा पाच टक्के निधी मिळावा यासाठी फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.किशोर चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी पंधरा मार्च  पर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यात निधी वर्ग करण्यात येईल असे सकारात्मक ऊत्तर दिले.

नगरपालिका मंजूर यादीतील सर्व दिव्यांग बांधवांनी आपले हयातीचे दाखले(स्वंयंघोषणापञ) नगरपरिषदेच्या संबंधित विभागात किंवा नितीन महाजन, मून्ना चौधरी,नाना मोची अहेसान कुरेशी यांचेकडे जमा करावयाचे आहेत. व नविन दिव्यांग बांधवांनी पंधरा फेब्रुवारी पर्यत नोंदणी करावी असे आवाहन फैजपुर शहराध्यक्ष नितीन महाजन यांनी केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष नितीन महाजन,ता.अध्यक्ष नाना मोची, सचिव मून्ना चौधरी, ऊपाध्यक्ष ललित वाघुळदे,सल्लागार राहुल कोल्हे व सदस्य सागर कुरेशी गणेश भारंबे चेतन तळेले अंकुर भारंबे,अबु बजाज,मो.वसिम, अयसान कुरेशी, रोहीत तायडे ,रियाज ,अमिन तडवी, रोहीत भारंबे  व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सविस्तर माहितीसाठी दिव्यांग सेना फैजपूर शहराध्यक्ष अध्यक्ष नितीन महाजन(9511792212) यांचेशी संपर्क करावा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.