दिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. देशात गेल्या 91 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 42 हजार 640 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 167 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

गेल्या २४ तासात देशात 81 हजार 839 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 99 लाख 77 हजार 861 वर गेला आहे. देशात 2 कोटी 89 लाख 26 हजार 38 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 89 हजार 302 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 62 हजार 521 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 28 कोटी 87 लाख 66 हजार 201 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.