दिलासादायक !  देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

0

नवी दिल्ली: कोविड-19 च्या नियंत्रणासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर आता वेगाने 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे. आजपर्यंत, सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 1,19,696 इतकी जास्त झाली आहे.

तसेच, 2,15,125 सक्रिय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु असून, तर 3,34,821 रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर, 59.07 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत, एकूण 13,099 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.

चाचणी प्रयोगशाळांची संख्या सतत वाढत आहे. भारतात सध्या कोविड-19 साठी समर्पित 1049 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शासकीय क्षेत्रातील 761 प्रयोगशाळा आणि 288 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

नमुना चाचणी देखील जोरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2,10,292 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 86,08,654 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.