दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ५२१ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव  प्रतिनिधी : जिल्ह्यात आज पुन्हा नवे रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. गेल्या २४ तासात ५२१ नवे रुग्ण आढळून आढळून आले आहे. तर ६६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात लावलेल्या कडक लॉकडाउनचा परिणाम आता दिसू लागला आहे. आज ५२१ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३६ हजार २८५ वर पोचली आहे. तर ६६५ रुग्ण बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २४ हजार ३४६ वर पोचला आहे. दरम्यान,  गेल्या २४ तासांत ११  बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या २ हजार ४३८ वर पोचली आहे.

 असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात ५१, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ५१, अमळनेर ०४, चोपडा ५४, पाचोरा ०३, भडगाव ०२, धरणगाव १४, यावल ३७, एरंडोल १९, जामनेर ७०, रावेर ५०, पारोळा १५, मुक्ताईनगर ४४, बोदवड १५, चाळीसगाव ७०,  अन्य जिल्ह्यातील ९.

 

Leave A Reply

Your email address will not be published.