दिलासादायक : आज ८४४ नवे रुग्ण तर ८२२ कोरोनामुक्त

0

जळगाव : जळगाव शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आता अन्य तालुक्यात आढळून येत आहेत. आज जळगाव शहरात शंबरहून कमी रुग्ण आढळून आल्याने दिलासादायक आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात दिवसभरात ८४४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच ८२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून येत होते. मात्र आज जळगाव शहरात ६१ नवे रुग्ण आढळून आले आहे. मात्र  जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये संसर्ग वाढत आहे. आज भुसावळ, चाळीसगाव आणि चोपड्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.  आज ८४४ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या  १ लाख ३० हजार ७३१ वर गेली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १८ हजार ५६८ इतका झाला आहे. आज १२ जणांचा मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा २ हजार ३४९ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- ६१, जळगाव ग्रामीण- १६, भुसावळ- १३२, अमळनेर- १२, चोपडा- १५०, पाचोरा- २०, भडगाव- १५, धरणगाव-६०, यावल- २३, एरंडोल- ७४, जामनेर- ४७, रावेर- २६, पारोळा-०३, चाळीसगाव- ९४, मुक्ताईनगर-५२, बोदवड- ४९, अन्य जिल्ह्यातील- १०.

Leave A Reply

Your email address will not be published.