त्या दोघां पोलिसांचे निलंबन ; दारू पिऊन मारहाण भोवली

0

भुसावळ :- दारूच्या नशेत बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे यांनी माजी प्रभारी नगराध्यक्ष हाजी नईम पठाण यांचे पुत्र तथा जीम चालक जुबेरखान नईम खान पठाण (वय३३)रा.ग्रीन पार्क,खडका रोड,भुसावळ यांना मारहाण केल्याची घटना ७ मार्च रोजी रात्री १२-१५वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानका जवळ घडली होती.

यातील आरोपी दोघे पोलिस कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे या पोलिसांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती. नंतर संशयीतांची जामिनावरही सुटका करण्यात आली होती.

दरम्यान जीम चालकाला अमानुषपणे पोलिसां कडून होणा-या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आल्याने पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोघाही पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव रविवारी सायंकाळीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडे रवाना केला होता. सोमवारी जिल्हा पोलिस पोलिस निरीक्षकांनी प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगलेंना अंमलबजावणी करीता पाठवला त्यांनी यावर त्वरित कारवाई केल्याने सोमवारी सायंकाळीच या पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले .या घडल्या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.