तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

0
कजगाव ता भडगाव- निलेश पाटील- प्रतिनिधी
 सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन चा चौथा टप्पा जााहीर करण्यात आला आहे मात्र कजगाव येथे कुठलेही कोरोनाचे गांभीर्य लक्षात आलेले दिसून येत नाही अनेक लोक मोठ्या प्रमाणावर बिनधास्तपणे गावात व बस्थानक परीसरात वावरतांना दिसून येत आहे  गेल्या काही दिवसांपूर्वी भडगावच्या तहसिलदार माधुरीताई आंधळे यांनी कजगाव येथे भेट दिली असता त्यांनी गावातील वास्तवचित्र समोर पाहून विविध दुकानदारांना शोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या व सूचनांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील व्यापाऱ्यांना दिला मात्र  त्यांच्या  इशाऱ्याकडे संबंधितांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे शोशल डिस्टन्गसिंग पाळण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे वारंवार सूचना करूनही व्यापारी जुमानत नसल्याने अनेक दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा सामान्य नागरिकांना मधून व्यक्त केली जात आहे. तरी संबधीत अधिकाऱ्यांनी आता कठोर पावले उचलून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संबधीत दुकांदारावर कठोर कारवाई करावी व विनाकारण फिरणाऱ्यांना वठणीवर आणावे अशी मागणी होत आहे.
“””: एक पोलीस उपनिरीक्षक व वाढीव कर्मचारी द्यावे
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पाहीजे तेवढि सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही अनेक लोक तोंडाला मास्क वगैरे चा उपयोग करीत नाही अनेक लोक काम नसतांना बस्थानक परिसरात गर्दी करून गप्पा मारीत असतात. तर गावाला लागून महामार्ग असल्याने अनेक वाहन अत्यावश्यक सेवेच्या नावाने फिरत असतात व अनेक वाहनांमधून प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे व जसे शहरात तगडा पोलीस बंदोबस्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आला आहे तसाच बंदोबस्तात कजगाव येथे देण्यात यावा कारण भडगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव व व्यापारी केंद्र असल्याने येथे रहदारी मोठ्या प्रमाणावर असते  व कायम गर्दी असते त्यामुळे कजगाव गावात व बस्थानक परिसरात एक पोलीस उपनिरीक्षक व वाढीव कर्मचारी द्यावेत अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.