डाँ माने यांचे सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी : गुलाबराव वाघ

0

पारोळा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाने नेहमीच ७० टक्के समाजकारण व ३० टक्के राजकारण केले आहे.रुग्णवाहीका व वैद्यकिय शिबीराचे आयोजन करुन शिवसेनेने नेहमीच जनसामान्यांचा दुवा घेतला आहे.आज शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी डाँ हर्षल माने यांनी सर्वरोग निदान शिबीर घेवुन शिवसेनेची परंपरा जोपासली आहे.त्यामुळे हे शिबीर गरजुंसाठी संजीवनी ठरणार असल्याचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ हर्षल माने यांनी आयोजित केलेल्या कृष्णा क्रिटीकल हाँस्पीटल येथे सर्वरोग निदान शिबीर प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिबीरात शिवसेना माजी शहर प्रमुख आण्णा चौधरी,आर पी आयचे राजु जावरे,आर टी सोनार यांचेसह हृदयरोग मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत शिंदे,डाँ अभिषेक फिरके,डाँ आर एस पाटील,स्री रोग तज्ञ डॉ. मनीषा पाटील,डाँ दिपाली माने,अस्थिरोग तज्ञ डॉ. दिनेश पाटील, मानसोपचार तज्ञ डाँ. पंकज संघवी, बालरोग तज्ञ डाँ. भूषण चव्हाण, मुळव्याध भगंदर तज्ञ तथा एम ए जनरल सर्जन डॉ.मनोज पाटील, कान नाक घसा तज्ञ डॉ.प्रियंका शिंदे, भुलरोग अतिदक्षता तज्ञ डॉ. महेश पाटील,शांतीलाल चव्हाण, जनरल फिजिशियन डॉक्टर डॉ. निलेश देसले आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ हर्षल माने यांनी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनाचे महत्व सांगुन पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडु व  गरजुंसाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याबाबत ग्वाही दिली शिबीरात गरजुंना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन मोफत उपचाराबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची स्थापना व यासाठी स्व, बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्त्यांशी असलेले नाते याबाबत सविस्तर माहीती देत कोरोना काळात डाँ हर्षल माने यांची वैद्यकिय सेवेचे कौतुक करित पक्षाने कामाचा बळावर त्यांची केलेल्या नियुक्तीचे स्पष्टीकरण दिले.

यावेळी  ३०० गरजु रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.