ट्रकखाली चिरडून पादचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू

0

बर्‍हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर अपघात

यावल ,दि 7 –
शहरातून जाणार्‍या बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर टीपाइंटच्या वळणा जवळ अवजड ट्राला खाली येत एक पादचारी चे हात पायाचे तुकडे होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी यावल येथे घडली.
या अपघातामुळे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत हस्तक्षेप लोकप्रतिनिधी बाबत शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळी आठ वाजता दिलीप बाबुराव बिरारी वय पन्नास हा यावल बस स्टॅन्ड कडून बूरुज चौकाकडे जात होता याच वेळी त्याच्या मागून येणार्‍या भुसावळकडून चोपडा कडे जाणार्‍या बारा चाकी ट्रॉला क्रमांक एम एच ऐ बी 4934 च्यापुढील चाकाखाली येऊन त्याचा पाय दाबला जाऊन चेंदामेंदा झाला सकाळची थंडीची वेळ आणि गरीब घरातील व्यक्ती असल्याने उपस्थितांनी संयम राखून ट्रालाची कोणतेही तोडफोड, जाळपोळ न करता तो ट्राला पोलिसांच्या स्वाधीन केला गेल्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणचे एका सरळ रेषेतील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत जबाबदार लोकप्रतिनिधीने आपल्या वैयक्तिक राजकारणाच्या स्वार्थापोटी ,आणि प्रतिष्ठेसाठी हस्तक्षेप करून अतिक्रमण थे कायम ठेवले आहे, अतिक्रमणामुळे हा अपघात झाल्याने त्या काही लोकप्रतिनिधी बाबत यावल शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यावल, पोलीस, नगरपरिषद यांनी संयुक्त मोहीम राबवून येथील यावल चोपडा तथा बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या रोडला लागून असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई त्वरित करावी अशी मागणी शहरातून होत आहे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने सुद्धा अपघात ग्रस्त व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी विलंब झाल्याने उपस्थितांनी मोठया संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.