टाकरखेडा येथील नैराश्यापोटी शेतकऱ्याची आत्महत्या

0

यावल :- तालुक्यातील टाकरखेडा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने नैराश्यापोटी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. राजेंद्र शामराव सोनवणे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

राजेंद्र सोनवणे हे सोमवारी घरी एकटेच होते. त्यांची पत्नी शेतात, तर मुलगा यावल येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षणासाठी गेला होता. या कालावधीत सोनवणे यांनी नैराश्यापोटी विषारी द्रव प्राशन केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोनवणे शेतात का आले नाही? म्हणून त्यांच्या पत्नी घरी पहायला आल्या. यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. यानंतर राजेंद्र सोनवणे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉ. मंंगेश मेढे यांनी शवविच्छेदन केले. यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटेमागील नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.