झाल्टे ग्रुपतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप

0

जळगाव(प्रतिनिधी): झाल्टे ग्रुप तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. जळगाव शहरातील  शिवाजीनगर परिसरात गरजू विद्यार्थ्यांना झाल्टे ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे व सहकारी यांचे मार्फत शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी.एम.फौंडेशनचे अध्यक्ष योगेश नंनवरे,दिव्यांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत पंधारे, कैलास पंधारे,जावेद खाटीक हे होते.

यावेळी झाल्टे ग्रुप चे कार्यकर्ते इरफान शेख,अभय साळुंके,लियकात खान,दिलीप चौधरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.