झारखंड चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद

0

रांची :- झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एका कारवाईत दंतेवाडाचे भाजपचे आमदार भीमा मांडवी यांचाही मृत्यू झाला होता. भाजपचा ताफा निवडणूक प्रचाराहून येत असताना भुसुरूंग स्फोट घडविण्यात आला होता त्यात मांडवी यांचा मृत्यू झाला होता.

सीआरपीएफच्या ७ बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरु केलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात तीन दहशतवादी ठार झाले तर, 1 जवानाला आपला जीव गमवावा लागला. या कारवाईत 1 एके 47, 3 मॅगझिन्स, 4 पाईप बॉम्ब एतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.