जुलै महिन्यात नववी दहावी बारावीचे वर्ग सुरु करावेत – मुख्याध्यापक संघ

0

मुक्ताईनगर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 15 जून 2020 च्या परिपत्रकानुसार एक जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरु करावेत असे म्हटले आहे. परंतु तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे सदर वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बाधित झाले असून शिक्षण क्षेत्र ही त्यातून सुटलेले नाही. दरवर्षी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होते परंतु यावर्षी कोरोना मुळे जुलैपासून सुरू होणार होते. त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020 / प्र.क्र
86 / एस. डी.- 6 दिनांक 15 जून 2020 च्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी , दहावी व बारावी चे वर्ग एक जुलैपासून सुरू होणार होते परंतु त्यासंदर्भात अद्यापही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे आर पी पाटील , एन आय पाटील , पी . पी. दाणे, आर एस पाटील, एन. डी. काटे तसेच ए. के .सूर्यवंशी यांच्यातर्फे मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी धनके यांना निवेदन देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.