जीवनावश्यक सर्व वस्तुंचे भाव नियंत्रणात आणून दरवाढ मागे घ्या ; जलील पटेल

0

यावल(प्रतिनिधी) केंद्रसरकारने रासायनिक,खत बी- बियाणे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून कुंभकर्णी झोपलेल्याकेंद्र मोदी सरकारच्या निषेध करू आणि रस्त्यावर उतरू,असा इशारा कोरपावली ता. यावल.येथिल.रहीवासी.तथा.काँग्रेस सेवा.फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी दिला आहे.

नुकत्याच केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अत्यंत निगडित असलेले रासायनिक खतांची मोठी दरवाढ केलेली आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशात लॉकडाउनच्या आणि कोरोनाच्या या महामारीत हातात पैसा नाही कामधंदा बंद आहे. अशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच दैनंदिनी लागणारे सर्व प्रकारच्या वस्तूचे दर वाढल्याने शेतकरी शेतमजूर सामान्य जनता यात होरपळली जात आहे.

या सर्व किमती केंद्रसरकारने नियंत्रणात आणून रासायनिक,खत बी-बियाणे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून कुंभकर्णी झोपलेल्या केंद्र मोदीसरकारच्या निषेध करू आणि रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनीदिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.