जिल्ह्यात १५ दिवसाचा लॉकडाऊन ; काय सुरु काय बंद राहणार?

0

जळगाव : राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र या काळात आवश्यक वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजी विक्री, फळे विक्री डेअरी सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रवासी वाहतूक देखील सुरू राहणार आहे.

सर्व कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम द्यावे, तसेच त्यातून शासकीय कार्यालये, बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, विमा आणि मेडिक्लेम कंपन्या, औषध वितरणाशी संबधित कार्यालये, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व न्यायालये, लवाद, चौकशी समिती कार्यालये, तर वकिलांचे कार्यालय, सुरू राहू शकतात. हॉटेल्स होम डिलिव्हरी करु शकतात. तसेच कोविड नियमावलीचे पालन न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेशात म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवेशी संबंधित निर्मिती करणारे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्यावर निर्यातीचे बंधन आहे. अशा अस्थापना सुरू राहतील. पण त्यांना निर्यातीचे बंधन सिद्ध करावे लागेल. तसेच ज्या युनिटमध्ये उत्पादन प्रक्रिया अचानक थांबवता येत नाही असे कारखाने ५० टक्के कामगार क्षमतेने सुरू राहतील. या आदेशात सूट दिलेल्या कारखान्यांशिवाय इतरांनी या १ मे पर्यंत कारखाने बंद ठेवावे.

शाळा महाविद्यालये बंद, दहावी,बारावीच्या परीक्षेला सूट

जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यातून सूट देण्यात आली आहे. तसेच राज्याबाहेर घेण्यात येणाऱ्या परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.