जिल्ह्यात लवकरच शासकीय कापूस खरेदी सुरू होणार

0

जळगाव | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून जळगाव जिल्ह्यातील स्थितीची माहिती जाणून घेतली. दरम्यान, कापूस खरेदीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच खरेदी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा अाणि मालेगाव ही दोन्ही शहरे कोरोनाग्रस्त असून ते जळगाव जिल्ह्यालगत आहेत. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याची माहिती घेतली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.