जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढतेय ; आज ७४ रूग्ण आढळले

0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव  जिल्ह्यात दिवाळी आधी नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोख वर काढलं आहे. जिल्ह्यात बाधित रूग्ण दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ७४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

१७ सप्टेंबर पासून जिल्ह्यात नव्या बाधित रूग्ण संख्यापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आढळून येत होती. मात्र, दिवाळी झाल्यापासून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ४५७ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ५९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२९३ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ५६५ रुग्ण सध्या उपचार घेताय.

असे आढळले रूग्ण
जळगाव शहर –१७, जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ- ०१४, अमळनेर- ०८, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-०३,धरणगाव-००, यावल-०७, एरंडोल-००, जामनेर-०३,रावेर-०५, पारोळा-०२, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ७४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.