जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले ; दुसरी लाट घेतेय अतिवेग हॉस्पिटल बेड फुल परिस्थिती चिंताजनक

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील शहरात नव्हे ग्रामीण भागात देखील चांगलाच शिरकाव वाढत असून कोरोनाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. येत्या काही दिवसांत दररोज नव्याने रुग्ण आढळून आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून कोनतीही तयारी करण्यात येत नाही आहे.

5 राज्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत | वेगाने पसरत आहे. अनपेक्षितरित्या रूग्णसंख्या वाढत असून, येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्यात दररोज च्या वाढत्या आकडेवारी वर नवीन रूग्ण आढळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात गंभीर स्वरूपाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठीची आरोग्य यंत्रणा अपुरी पडू शकते. शहरातील तसेच जिल्हात सरकारी तसेच खासगी दवाखानेही फुल्ल होत आहेत. कोविड रूग्णालयात १०० टक्के रूग्ण असून, कोविड सेंटरही अपुरे पडू लागले आहेत. तर खासगी दवाखान्यातही जागा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लॉकडाऊनची प्रतीक्षा न करता आतापासून घरात राहण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासन तर्फे केले जात आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.त्यामुळे कोबिड रुग्णालय १०० टक्के भरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.