जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; पहा धडकी भरवणारी आकडेवारी

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत चालला आहे. आज दिवसभरात तब्बल 319 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल 158 तर चाळीसगावातील 71 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४ बाधित रुग्णांचा मृत्यू आला आहे.

 

सप्टेंबरपासून नियंत्रणात आलेला कोरोना गेल्या दहा- ते पंधरा दिवसापासून पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची संख्या वाढत आहे. आज ३१९ रुग्ण आढळून आले असून त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५८ हजार ८५४ झाली आहे. तर दिवसभरात केवळ ७१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५६ हजार १७८  झाला आहे. आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर – 158, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-12, अमळनेर-20, चोपडा-18, पाचोरा-4, भडगाव-7, धरणगाव-4, यावल-4, एरंडोल-0, जामनेर-4, रावेर-0, पारोळा-1, चाळीसगाव-71, मुक्ताईनगर-7, बोदवड-0 आणि इतर जिल्ह्यात 3 असे एकुण 319 रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.