जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ९५४ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात  ९५४ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहरातील ३१० रुग्णांचा समावेश आहे. चिंतेचा विषय असा की, जिल्ह्यात मृताच आकडा वाढत चालला आहे. आज दिवसभरात ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात एकुण ६७ हजार ६८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार २४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर चोपडा आणि बोदवड तालुक्यातून प्रत्येकी एक असे एकुण ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात मृताच आकडा १४२७ वर गेला आहे. जिल्ह्यात ६२४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ-७०, अमळनेर-१८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातून ४ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.