जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ३६३ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव प्रतिनिधी ।  मागील काही महिन्यांमध्ये जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना रूग्‍णांचा वेग मंदावलेला होता. परंतु, मागील आठवडाभरापासून यात सातत्‍याने वाढत असून, रोजचा वाढणारा आकडा हा जिल्‍ह्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजवत आहे.  आज बुधवारी जिल्ह्यात ३६३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे.  यात जळगाव शहरातील सर्वाधिक १६४ तर चाळीसगावातील ५३ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेल्‍या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज ३६३ रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे एकुण बाधितांची संख्या ही ५९ हजार ५८५ हजारावर पोहचली आहे. त्यापैकी ५६ हजार ४१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताच एकूण आकडा १३७९ वर गेला आहे. दरम्यान, १७९० रुग्णांवर उपचार सुरु आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर – १६४, जळगाव ग्रामीण-०६ भुसावळ-०६, अमळनेर-२४, चोपडा-३०, पाचोरा-०३, भडगाव-०३, धरणगाव-०३, यावल-०२, एरंडोल-११, जामनेर-०३, रावेर-०८, पारोळा-१७, चाळीसगाव-५३, मुक्ताईनगर-१८, बोदवड-०९ आणि इतर जिल्ह्यात 3 असे एकुण ३६३ रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.