जिल्ह्यात आज ११८२ नवे रुग्ण ; तर १५ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. मागील काही दिवसापासून बाराशेच्या आसपास रुग्ण संख्या आढळून येत असून आजही ११८२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १०९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृताच आकडा वाढताच आहे. आज तब्बल १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९४ हजार ७८२ झाली आहे. त्यात बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४२९ वर गेली आहे. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६९७ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ६५६ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर ३२३, जळगाव तालुका १०२, भुसावळ ६०, अमळनेर १११; चोपडा २२४; पाचोरा १६; भडगाव ०३; धरणगाव ३९; यावल ६३; एरंडोल ३८, जामनेर २४; रावेर ६३, पारोळा ०२; चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर६३; बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे ११८२ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.