कोविड केयर सेन्टर ला राजमुद्रा फाऊंडेशन ची २५ हजाराची आर्थिक मदत

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर कोविड केयर सेन्टर साठी राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या सौजन्याने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

अमळनेर शहर व तालुक्यात कोविड ची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक रूप घेत आहे,खाजगी हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेत.रुग्णांची होणारी हेळसांड पाहून प्रशासनाने सामाजिक,राजकीय संस्था व व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले होते.

यालाच साद देत राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या मदतीने अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी राजमुद्रा फाऊंडेशन चे पदाधिकारी किरण पाटील, अक्षय चव्हाण, कमलेश पाटील, सुमित पाटील, विशाल पाटील, सारंग लोहार , अक्षय पाटील, निखिल सूर्यवंशी, संजय चौधरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.