जिल्ह्यात आज १००७ नवे रुग्ण, तर १०३० कोरोनामुक्त

0

जळगाव । जिल्ह्यात आज पुन्हा बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज शुक्रवारी १००७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ००४ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर २१ जणांच्या मृत्यूने बळींची संख्या २ हजार १८४ वर पोचली आहे.  जिल्ह्यात सध्या १० हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहरात १४१, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १०१, अमळनेर ४७, चोपडा ३२, पाचोरा १४८, भडगाव ८,  धरणगाव १२, यावल ३१, एरंडोल ५८, जामनेर ११२, रावेर ४७, पारोळा १७, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर १११, बोदवड ६१, अन्य जिल्ह्यातील ३ असे एकूण १००७ रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.