जिल्ह्यात आज नव्या ३७ रुग्णांची नोंद, ७४ कोरोनामुक्त

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात ३७ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ७४ जण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाहीय.

आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार २९४ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार १५ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर ७०९  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात मृताचा एकूण आकडा २५७० वर गेला आहे.

 आजची आकडेवारी

जळगाव शहर-६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-५, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ०  असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.