जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत काँग्रेसचे आंदोलन

0

जळगाव  – मेडीकल कॉलेज मध्ये महिलांचा विनयभंग केलेल्या सुरवाडे नामक वॉर्डबॉयला तात्काळ निलंबित करावे व शासकीय महाविद्यालयातील रूग्णांकडून पैशांची मागणी करणारे रूग्णांच्या नातेवाईकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी  आंदोलन केले.

सिव्हिल मध्ये रामभरोसे चालणाऱ्या कामाबद्दल गुरुवारी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी सिव्हिल मध्ये जाऊन अधिष्ठाता भास्कर खैरे याच्याशी चर्चा केली तेव्हा आश्वासने दिल्याने कार्यकर्ताने आक्रमक रूप धारण केले होते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरीक हे औषध उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात येत असतात. रूग्णालयातील डॉक्टरांकडून  रुग्णांची व्यवस्थित उपचार तर केली जात नाही. उलट त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात येते. महिलांचा विनय भंग होतो,तसेच औषधी ही उपलब्ध नसतात. वेळप्रसंगी काही गंभीर आजाराच्या तपासण्या बाहेरून करण्यास सांगितले जाते. अशा वेळी ग्रामीण भागातील रुग्णांचे अतोनात हाल होत आहे.या सर्व प्रकाराबाबत सिव्हील प्रशासनाने करावी अन्यथा तालुका काँग्रेस कमेटी तर्फे मनोज चौधरींसह प्रमोद घुमे,धनराज जाधव,भिकन सोनवणे,आकाश कोळी, सागर केदर,महेंद्र कोळी,छोटू कोळी,निशा कोळी, ज्योती कुवर,सुनंदा धनराळे, ज्योती परदेशी मीरा सोनवणे,निर्मला कोळी या वेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.