जामनेर तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला ; जिल्ह्यात आज ११४२ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता व त्यापेक्षाही मृत्युचे सत्र वेगाने सुरुच आहे. आज सलग सहाव्या दिवशी २० पेक्षा अधिक म्हणजे दिवसभरात २२ मृत्युंची नोंद झाली. जिल्ह्यात आज दिवसाभार्त ११४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक २८७ रुग्ण जामनेर तालुक्यात आढळून आले आहे. त्यापाठोपाठ जळगाव शहर, रावेर, भुसावळ व चोपड्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान,आजच ११३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधीताचा आकडा १ लाख १२ हजार ६७० वर गेला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडाही ९९ हजार ५५४ वर पोचला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ११ हजार ११८ रुग्ण विविध रुग्णांमध्ये उपचार घेत आहे.  आज बुधवारी २२ बळींची भर पडून एकूण बळींचा आकडा १९९८ वर पोचला.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १८९, जळगाव ग्रामीण-३९, भुसावळ- ११४, अमळनेर- ३५, चोपडा- १०५, पाचोरा- ६६, भडगाव- ००, धरणगाव- १८, यावल- २७, एरंडोल- ६५, जामनेर- २८७, रावेर १०४, पारोळा – ३३, चाळीसगाव- १८, मुक्ताईनगर- ३९, बोदवड- ०१ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे एकुण १ हजार १४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.