जामनेर तहसील कार्यालयावर मोर्चा

0
जामनेर (प्रतिनिधी):-
भारत सरकारने नुकतेच पारित केलेला “नागरिकत्व संशोधन कायदा” हा भारतीय संविधान विरोधात असून या मुळे देशाची धर्मनिर्पेक्ष प्रतीमेला काळिमा फासण्याचा काम सरकारने केला आहे.तसेच या अमानवीय कायद्या विरोधात देशभरात होणाऱ्या प्रदर्शनात विशेषत: जामिया युनिवर्सिटी दिल्लीत पोलिसांनी केलेल्या पाश्वी कृत्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात जामनेर येथे अरफात चौक ते तहसील कार्यालय दरम्यान शांतीपुर्वक प्रदर्शन व मोर्चा काढण्यात आला .भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच अन्य धर्मनिर्पेक्ष व संविधानवादी पक्ष एकत्रीत या मोर्च्यात सहभागी झाले होते.तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपति यांना निवेदन सादर करून हा पाश्वी कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा या बद्दल मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे याना देण्यात आले .
तसेच मोर्च्यात सहभागी मान्यवरानी आपले मत या वेळी व्यक्त केले. या मोर्चात राष्ट्रवादीकाँग्रेस,काँग्रेस व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यात राष्ट्रीय काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शरद पाटील,शंकर राजपूत,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,किशोर पाटील,जिल्हा उपअध्यक्ष विलास राजपूत,सुरेश धारीवाल,संदीप हिवाळे,दिलीप पाटील,प्रल्हाद बोरसे,न्यानेश्वर बोरसे आदी पदाधिकारी निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.