जामनेरला विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जामनेर:शहरातील जळगावरोड परीसरातील संगीता विनोद कुमावत वय ४२ या विवाहीत महीलेने घरगुती किरकोळ कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.याबाब माहिती अशीकी रहात्या घरामधीलच स्वयंपाकघरातील छतावरील पंख्याला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसले. लागलीच पोलीसांना पाचारण करून प्रेत दवाखान्यात आणण्यात आले.पोलीसठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत महीलेच्या पच्छात सासु,सासरे,पती,मुले असा परीवार आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.