जानेवारीत महिन्यात १० दिवस बॅंक बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

0

मुंबई : नवीन वर्ष सुरु होण्यास आता अवघे काही तास शिल्लक बाकी राहिले आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. परंतु, सुट्यांची माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडून जातो. महत्वाचे म्हणजे, जानेवारी महिन्यात देशातील बॅंकांना 10 दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीनुसार सर्व बॅंकांना नवीन वर्षारंभानिमित्त 1 जानेवारी 2020ला सुट्टी असणार आहे. त्याशिवाय दरमहिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या, चौथ्या शनिवारीदेखील सुट्टी असणार आहे.

देशभरातील बॅंका जानेवारी महिन्यात विविध सण आणि इतर कारणास्तव बॅंकांना दहा दिवस सुट्टी असणार आहे. यातील काही सुट्ट्या या स्थानिक सण किंवा महत्त्वाच्या कारणांशी संबंधितसुद्धा आहेत. अनेकदा खातेदारांना बॅंक बंद असल्याची माहिती नसल्याने त्यांचीही ये-जा होती. यामुळे खालील माहिती बॅंकेतील कर्मचारी आणि खातेदार दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे.

1 जानेवारी – नवीन वर्षारंभ

2 जानेवारी – गुरुगोविंद सिंग जयंती

7 जानेवारी – इमोईनू इरात्पा (मणीपूर आणि ईशान्य भारतातील संपत्ती, समृद्धी आणि संसधानांच्या देवतेचा हा सण आहे.)

8 जानेवारी –  गान – गाई (ईशान्य भारतातील एक उत्सव)

14 जानेवारी – मकर संक्राती

15 जानेवारी – भोगी/ पोंगल / भोगली बिहू / तुसू पूजा / लोहरी / हादगा

16 जानेवारी – उझावर थिरूनल (तामिळनाडूतील शेतकऱ्यांचा सण)

23 जानेवारी – सुभाषचंद्र बोस यांची जयंती

30 जानेवारी –  सरस्वती पूजा / वसंत पंचमी

Leave A Reply

Your email address will not be published.