जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर

0

मनपा प्रशासनाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष

जळगांव, दि.7 –
जिल्हयाच्या मुख्यालयी पश्मिम व मध्य मार्गावर जाणार्‍या प्रवासी व मालवाहतुकीचे अ दर्जायुक्त रेल्वेस्थानक आहे. स्थानकावर आधुनिक काळानुसार सुविधा वा त्यात बदल करून देण्यात येत असल्या तरी स्थानकाबाहेरील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमीच गंभीर असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील 7 ते 8 महानगरानंतर जळगांव शहराचा उल्लेख होत असला तरी रेल्वे वा बसस्थानकांबाहेतील अतिेक्रमणांमुळे सर्वसामान्य नागरीकांना मात्र याचा फटका सहन करावा लागतो.
जळगांव रेल्वे स्थानकावर गुवाहाटी, कोलकाता,सांतरागाछी, भुवनेश्वर, पुरी, विशाखापट्टणम, नागपूर, जबलपूर, गोरखपूर वाराणसी आदी मुख्य स्थानकांवरून लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाडयांसाठी मुंबई,अहमदाबाद,पोरबंदर,ओखा पुणे, कोल्हापूर, गोवा बेंगलूरू आदी गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. भुसावळ विभागातील अ दर्जाच्या या स्थानकावरून दिवसभरात सूमारे 70 ते 80 प्रवासी गाडयांपैकी बर्‍याच मेल एक्सप्रेस गाडयांना थांबा देण्यात आला आहे. तर सूरत व मुंबईसह देवळाली शटल सेवा या माध्यमातुन हजारो नव्हे लाखो प्रवाशांची वर्दळ दिवसभर या स्थानकावरून होत असते. जिल्हयाच्या ठिकाणी शैक्षणिक हब असल्याने शाळा महाविद्यालये कोचींग क्लासेस साठी विद्यार्थी, व्यवसाय, खाजगी वा अनेक विभागांची प्रशासकिय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी अधिकारी वर्गाची संख्या मोठया प्रमाणावर येजा करीत असते.
पालिका हद्दीत असूविधांचा भडीमार मोठया प्रमाणावर
रेल्वे स्थानकाबाहेर पडताच नेहमीच कचर्‍याचे घाणीचे जागोजागी ढिग, फलाटासह पादचारी पुल वा अन्य ठिकाणी भिक मागणार्‍यांची मोठी संख्या, रस्त्यावर निश्चित मर्यादे बाहेर अतिक्रमणाच्या विळख्यातुन मोठ्या प्रयासाने प्रवाशांना बाहेर पडावे लागते. मनपा हद्दीत मोठया प्रमाणावर स्वच्छतागृह वा प्रसाधनगृहांचा अभाव असल्याने अनेकांची विशेषतः महिला वर्गाची कुचंबणा होते. काही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचराकुंडया हा मोठा गहन प्रश्न असून प्रशासनाच्या स्वच्छता आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी ओला सुका कचरा न उचलला गेल्याने ठिकठिकाणी कचर्‍यामुळे येणार्‍या दुर्गधीचा देखील सामना करावा लागतो. मनपाचे सुंदर शहर स्वच्छ शहर, हरीत शहर वा स्वच्छतेचा संकल्प 2018 याला हरताळच फासला गेलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.