जळगाव-मुंबई-अहमदाबाद विमानसेवेला एक सप्टेंबरपासून सुरुवात !

0

जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या दीड ते दोन वर्षापासून बंद पडलेली जळगावातील विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. येत्या दि. १ सप्टेंबर पासून या विमानसेवेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे एका तासात जळगावकरांना मुंबई अाणि अहमदाबाद या महानगरात पाेहाेचता येणार अाहे. त्या बराेबरच काेल्हापूरशीही जळगावची कनेक्टीव्हीटी असेल. या विमानसेवेमुळे नागरिकांची चांगलीच सोय होणार आहे.

साेने, कापड, भुसार मालाची राज्यात प्रसिध्द असलेल्या जळगाव बाजारपेठेला विमानसेवेने जाेड मिळून बाजारपेठे विस्तारीत हाेण्यास मदत हाेणार अाहे. दरम्यान, १ सप्टेंबर राेजी विमानसेवा सुरु करण्यासाठी ट्रु-जेट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जळगावात दाखल झाले अाहेत. रविवारी विमानसेवेचे अाैपचारिक उद‌्घाटन जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, खासदार उन्मेष पाटील, अामदार सुरेश भाेळे यांच्या उपस्थितीत हाेणार अाहे. ट्रु-जेट कंपनीतर्फे एटीअार विमानाद्वारे ही सेवा पुरवण्यात येणार असून ७० अासन क्षमतेचे विमान असणार अाहे. अहमदाबादहून जळगावसाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान निघून १० वाजून ५५ मिनीटांनी पाेहचेल. २० मिनिटांनी म्हणजे ११ वाजून १५ मिनिटांनी मुंबईला रवाना हाेऊन १२ वाजून २५ मिनिटांनी पाेहचेल. मुंबईहून १ वाजता काेल्हापूरला विमान उडाण भरेल. तेथे ते २ वाजून २० मिनिटांनी लॅण्ड हाेईल. काेल्हापूरहून २ वाजून ४५ वाजता परतीचा प्रवास सुरु हाेईल. मुंबईला ३ वाजून ५५ मिनिटांनी विमान पाेहोचेल. मुंबईहून जळगावला ४ वाजून ३० मिनिटांनी विमान निघून जळगावला ५ वाजून ४० मिनिटांनी लॅण्ड हाेईल. तर जळगावहून ६ वाजून ५ मिनिटांनी अहमदाबादकडे टेकअाॅफ घेवून विमान अहमदाबादला ७ वाजून २० मिनिटांनी लॅण्ड हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.