जळगावात स्कूल बसला ट्रकची धडक ; तीन विद्यार्थी जखमी

0

जळगाव (प्रतिनिधी) । शहरातील रुस्तमजी शाळेच्या स्कूल बसला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. या धडकेत स्कूल बसमधील तीन विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रकच्या (क्रमांक एम.एच.४६,एफ.०१२१) चालकाचा ट्रकवरील ताबा सूटल्याने त्याने सरळ रुस्तमजी शाळेच्या बसला(क्रमांक एम.एच. १९, वाय. ६००५ धडक दिली. ही घटना कालिका माता मंदिराजवळ सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान,या धडकेत बसमधील विद्यार्थी आरुष तुषार कोळी, गौरजा विश्वनाथ खडके व विराट सुयोग चोपडे यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्कूल बसचे चालकाच्या बाजूने नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक आणि स्कूल बस पोलिसात जमा केले असून ट्रक चालक गणेश विष्णू पाटील (रा. कर्की ता. मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.