जळगावात प्राचार्याचे बंद घर फोडले ; ७ लाखांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव : शहरातील दौलत नगर परिसरात राहणाऱ्या किडस् गुरुकूल स्कूलच्या प्राचार्या मीनल संतोष जैन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा ७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दौलत नगरातील मुख्य रस्त्यावरच प्लॉट क्र.२६ मध्ये मीनल जैन या वास्तव्याला असून गेल्या महिनाभरापासून त्या आई प्रेमलता, वडील संतोष जैन, भाऊ नितीन जैन व वहिणी कृती जैन यांच्यासह किडस् गुरुकूल स्कूलमध्येच वास्तव्याला होते. मंगळवारी सकाळी शेजारी राहणारे गजानन चावदस मराठे यांनी मोबाईलवर संपर्क घरुन घराचे कुलुप व कडी कोंयडा तुटल्याची माहिती जैन यांना दिली. त्यानुसार त्यांनी सकाळी घरी येऊन पाहिले असता घरात चोरीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी कपाट, बेडमधील दागिने, रोेख रक्कम, नकली दागिने, महत्वाचे कागदपत्रे लांबविल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक, एलसीबीच्या पथकासह श्वान पथकाची घटनास्थळाला भेट दिली असुन चोरट्यांच्या शोधार्थ यंत्रणा कामाला लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.