जळगावसह राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये उठणार लॉकडाऊन, तर काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध कायम

0

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसंच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे  नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी काल दिली.

11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये निर्बंध कायम असतील. या 11 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असल्याचं टोपेंनी सांगितलं.

या 25 जिल्ह्यातल्या निर्बंधामध्ये शिथिलता 

मराठवाड्यातील परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली कोकणातील रायगड, ठाणे, मुंबई उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा, असंही ते म्हणालेत. तसंच दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर जास्त संख्येनं हळूहळू सुरु करता येतील. तर शनिवार आणि रविवारपैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी

राज्यात तिसरी लाट येईल तेव्हा येईल. राज्याची तिसऱ्या लाटेसाठी तयारी आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. पण येणाऱ्या लाटेसाठी आमची तयारी झाली आहे. या लाटेसंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. सरकारनं लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेसाठी सर्व बाजूंनी आपण तयार असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.