जगातील सर्वाधिक ट्रॅफिक शहरात बेंगळुरू ‘टॉप’

0

नवी दिल्लीः  जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असलेल्या टॉप १० शहरात भारतातील बेंगळुरू हे शहर ‘अव्वल’ ठरले आहे. तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आणि भारताची राजधानी दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. शहर मोबिलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने आणि लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट टॉमटॉम च्या एका सर्व्हेत ही माहिती देण्यात आली आहे. यात जगात बेंगळुरू सर्वात जास्त ट्रॅफिक असलेलं शहर ठरलं आहे.

या सर्व्हेत भारतातील टॉप शहरांचा समावेश करण्यात आला असून यात म्हटले की, दिल्लीकरांना पिक अवर्स दरम्यान गाडी चालवताना अन्य शहरांच्या तुलनेत वर्षाला १९० तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागतो. तो एकूण ७ दिवस आणि २२ तास इतका आहे. गेल्यावर्षी दिल्लीत सर्वात जास्त ट्रॅफिक २३ ऑक्टोबर रोजी होते. जे ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. त्या दिवशी रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी देशभरातून शेकडो दिव्यांग विद्यार्थी मंडी हाऊससमोर आंदोलनाला बसले होते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जगभरातील ५७ शहरात हा सर्व्हे करण्यात आला आहे. यात ‘टॉप’वर बेंगळुरू हे शहर आहे. या ठिकाणी ७१ टक्के कंजेशनची नोंद करण्यात आली. तर ६५ टक्क्यांसह मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. पुणे ५९ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे. टॉप १० च्या शहरात मनीला दुसऱ्या स्थानावर, बगोटा तिसऱ्या स्थानावर, मॉस्को सहाव्या स्थानावर, लीमा सातव्या इंस्ताबुल नवव्या तर जकार्ता दहाव्या स्थानावर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.