चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी एकमुखी ठराव मंजूर!!

0

चोपडा  |  प्रतिनिधी

अत्यंत डबघाईला कारखाना गेलेला असताना तो सुरू व्हावा या उद्देशाने गेल्या आठवड्यात आजी माजी संचालकांची बैठक पार पडली होती त्या अनुषंगाने आज कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचे असेल तर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ठराव लागेल म्हणून आज दुपारी एक वाजता कारखाना साइटवर सर्व विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वसाधारण सभेला ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने सर्व नेत्यांच्या उपस्थितीत चोपडा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात एकमुखी ठराव करण्यात आला आहे.
 या सर्वसाधारण सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील,दिलीप सोनवणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख पाटील, कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, माजी चेअरमन एड घनश्याम पाटील, यशवंत निकम ,चोपडा पीपल बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा शेतकरी संघाचे चेअरमन शेखर पाटील, चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, दोडे गुजर संस्थांनचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी जि प सदस्य संभाजी पाटील, विजय पाटील, संचालकांमध्ये आनंदराव रायसिंग,प्रवीण गुजराथी,निलेश पाटील, गिरीश पाटील,साहेबराव पाटील,सुनील महाजन,गोपाल धनगर,प्रकाश रजाळे,जितेंद्र पाटील,गोपाल धनगर,पी बी पाटील,एड डी पी पाटील,राजाराम पाटील,भरत पाटील, आदी मंचावर उपस्थित होते.
**आजच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला कारखाना चेअरमन अतुल ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये बोलताना सांगितले की 117 कोटी संचित तोटा कारखान्यावर आज असून त्यामुळे कोणतीही बँक अर्थपुरवठा करण्यास तयार नाही, खासगी बँकांचे व्याजदर हे जास्त असून त्यामुळे दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत गेला आहे.  दिवसेंदिवस संचित तोट्यात वाढ होत असताना ,2017-18 साली साखरेचे उत्पन्न कमी मिळाले म्हणून शेतकऱ्यांनी उसाचे पेमेंट करता आले नाही.आजच्या सभेत सभासदांच्या मजुरी झाल्याशिवाय सर्वानुमते ठराव करता येणार नाही, त्यामुळे आजच्या सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठराव करून चोसाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय द्यावा अशी विनंती यावेळी ठाकरे यांनी केली होती.
कोण काय म्हणाले
 आजच्या सर्वसाधारण सभेला सर्व नेत्यांसह आजी माजी संचालक याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत म्हणून त्याचा आपण टाळ्या स्वागत करा .ज्यांना कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचा असेल त्यांनी अगोदर पार्टी समोर आणावी.
 –नारायण पाटील चहार्डी
कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय धोंडू उखाजी पाटील यांनी अत्यंत काटकसरीने हा कारखाना फक्त 27 कोटी मध्ये उभा केला मात्र कारखाना सुरू राहावा यासाठी आप्पा गेल्यानंतर कोणीही ऊस लावावा असे कोणी सांगितले नाही. अरुण गुजराथी पंचवीस वर्षे मंत्री राहिले होते त्यांनी आमचे कान पकडुन शिकवले पाहिजे होते,मात्र सहकाराच्या संस्थेकडे दुर्लक्ष केले म्हणूनच आज या तालुक्याच्या हाल आहेत. गजेंद्र राजपूत विरवाडे
शेतकऱ्यांसाठी उस हे हक्काचे पीक असताना शेतकरी घाबरलेला आहे .ऊस जीवदान देणारे एकमेव पीक असून सर्व पक्ष पॅनल याठिकाणी बळजबरीने बसवले गेले आहे .नाव डुंबत असताना आणि संचालकांनी उड्या मारून घेतल्या आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला हे चुकीचे झाले आहे राजीनामा देणाऱ्या संचालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. पैसे बुडणार नाहीत नियमानुसार व्याजासह पैसे मिळतील.
–एड रवींद्र निकम ,माचले
कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या अगोदर शेतकऱ्याचे पेमेंट ला प्राधान्य दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या थकीत पेमेंटचे काय,भाडे तत्वावर घेणाऱ्या कंपनीला बोलवा, मागच्या साडेतेरा कोटी व अडीच कोटी  व कर्मचा-यांचे थकीत पगार चे काय ?,हे अगोदर सांगितले पाहिजे, तरच कारखाना भाडेतत्वावर दिला गेला पाहिजे. –एड एस डी सोनवणे
माजी संचालक चोसाका
ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या  देणी अगोदर दिली पाहिजे मगच कारखाना भाडेतत्त्वावर द्यावा .येणे रकमा देखील कारखान्याने व्याजासह वसूल करावे.
 –विश्वनाथ चौधरी अकुलखेडा
राज्यात सर्वत्र कारखान्याची अवस्था बिकट आहे अनेक कारखान्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले असून भाड्यावर  देऊन तो जिवंत कसा राहील याबाबत आपण विचार केला पाहिजे. कारखाना ठरावा नंतरही सर्व गोष्टी करता येतील.
–एड डीपी पाटील, माजी संचालक चोसाका
कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचा होता तर कारखान्याच्या संचालक म्हणाले एक वर्ष का वाट पाहिली.कारखान्याच्या या वर्षीच्या हंगाम कसा सुरू होईल याचा विचार करा.आचारसहिता लागनाच्या अगोदर सर्व प्रस्तावनेसह संबंधित फाईल  फिरली पाहिजे.  कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आजच्या आज शंभर कोटी रुपये कोणीही देणार नाही आणि कारखाना घेणार नाहीत.संचालकांचे व नेत्याची विश्वासार्हता  पूर्ण संपली असून कारखाना भाडेतत्वावर देण्यात संदर्भातल्या सर्व अटी नियम या पाहूनच कारखाना दिला गेला पाहिजे.
एस बी पाटील
अध्यक्ष कृषी समिती चोपडा
** कारखान्याचे संस्थापक चेअरमन धोंडू उखाजी पाटील यांना शेवटची श्रद्धांजली होऊ नये म्हणून हा कारखाना सुरू व्हायला पाहिजे.त्यासाठी आज ठराव एकमुखाने मंजूर करावा..
 –राजाराम पाटील
काँग्रेस तालुकाध्यक्ष चोपडा
आज जी परिस्थिती कारखान्यावर आली आहे ती परिस्थिती येईल असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. आता कारखान्यात सर्व चांगले होण्यासाठी वेळ लागेल. आज ठराव केला तरच चोसाका भाडेतत्वावर जाऊ शकतो.कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या अगोदर शेतकऱ्यांची देणी कामगारांची देणी या सर्व गोष्टींचा विचार करून जो कोणी कारखाना भाडेतत्वावर घेईल त्याचा टेंडर देखील जनरल सभेच्या मिटिंग मध्ये ठेवले पाहिजे. एक महिन्याच्या आत जो  शेतकऱ्यांचे पैसे घेऊन देईल त्याला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा हरकत नाही. रावेर देखील भफे तत्वावर दिला होता,त्यात संचालक मंडळ होते पण त्यांना कोणतेच आर्थिक अधिकार नव्हते .सर्व चुका संचालकांच्या आतापर्यंत झालेल्या असून कारखाना भाडेतत्वावर दिला गेला तरच सुरू होऊ शकतो.
ऍड घनश्याम पाटील
माजी चेअरमन चोसाका
आजच्या सभेला अनेक सभेनंतर आजी माजी संचालक,नेते मात्र मोठ्या संख्येने हजर होते,
आणि सभासद देखील मोठ्या संख्येने हजर होते.विशेष म्हणजे ज्या संचालकांनी राजीनामा देऊन संचालक मंडळातून पळ काढला तेच संचालक खोटा आव आणून व्यासपीठावर बसले होते.यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पणे थकीत पेमेंट साठी चेअरमन अतुल ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते.शेवटी एकमुखी चोसाका भाडे तत्वावर देण्याचा निर्णयानंतर चेअरमन अतुल ठाकरे व संचालक तसेच नेत्यांचे चेहरे फुललेले दिसून आले आणि त्यांनी शेवटी मोकळा श्वास सोडला होता.
आधार पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.