चोरीस गेलेल्या १० मोटरसायकली हस्तगत ; पिंपळगाव हरे. पोलिसांची कामगिरी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा परिसरातून गेल्या काही महिन्यांपासुन मोटरसायकल चोरीचे प्रकार घडत असल्याने पिंपळगाव (हरे.) पोलिसात याबाबत तक्रारी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणांची सखोल चौकशी करत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पिंपळगाव (हरे.) पोलिसांना यश आले असुन आरोपींकडुन १० मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गणेश बाबुलाल परदेशी (वय – ४२) व अंकुश भिमराव मरसाडे (वय – २३) दोघं रा. जंगीपुरा ता. जामनेर यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशी अंती त्यांचेकडुन हिरो होंडा प्लस – १, हिरो होंडा सि.डी. डिलक्स – २, एफ. झेड. यामाहा एस. – १, बजाज प्लॅटीना – १, बजाज डिस्कव्हर – १, होंडा अॅक्टीव्हा – १, हिरो एच. एफ. डिलक्स – १, हिरो मॅस्ट्रो – १ व होंडा ड्रिम युगात – १ अशा १० मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. याकामी सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजीत पाटील, निवृत्ती मोरे, पोलिस नाईक अरुण राजपुत, रविंद्रसिंग पाटील, पोलिस काॅन्स्टेबल संदिप राजपुत, सचिन वाघ यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.