आरोग्य सेविका शोभा पाटील यांनी राबविला हळदी कुंकूचा सर्वो उत्कृष्ट उपक्रम

0

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) :  कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका सौ. शोभा माधव पाटील यांनी स्वखर्चाने केला नवीन जोडफ्यांसह गरीब सनदा मातांचा प्रोटीन पॉडर, भाजीपाला ट्रे, देऊन सत्कार करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू कार्यक्रम दि.३१ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात  संपन्न झाला , आरोग्यसेवीका सौ.शोभा पाटील ह्या स्वखर्चाने , गरीब पी.एन.सी.(सनदा) माता , नवीन जन्मलेली पहिली मुलगी झालेली माता यांना प्रोटीन पॉवडर , तर नवीन लग्न झालेले जोडपे यांचा भाजीपाला ट्रे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शोभा पाटील यांनी आरोग्यसेवेत सर्वात्कृष्ट सेवा दिल्याने त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याकार्यक्रमास्थाळी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभवल्याने ता.वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज दादा शेख यांनी व जि.प.मा. अध्यक्षा उज्वला पाटील यांनी आरोग्यसेवीका शोभा पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच ता.वैद्यकीय अधिकारी डॉ. नाजीम शेख यांनी कासोदा परिसरातील सर्व आशा स्वयंमसेविकांनी कोरोना सथारोगाच्या वेळी उत्कृष्ट सेवा दिल्याने त्यांचा कोरोनयोद्धा म्हणून सत्कार केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्वलाताई पाटील होत्या.  तर कार्यक्रमाप्रसंगी जि.प.च्या मा. सदस्य तथा शिवसेना महिला आघाडी प्रमुख महानंदाताई पाटील , ता.वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज शेख, ता.आरोग्य विस्तार अधिकारी एस बी राठोड, आरोग्य सहाय्यक आशालता मराठे, कासोदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निशाद शेख, डॉ. पृथ्वीराज वाघ, डॉ. अक्षयानी कोकाटे, गावांतील नवीन लग्न झालेले जोडपे, सनदा माता, आशासेविका, राहुल मराठे, उपकेंद्रातील कर्मचारी व आदि उपस्थित होते.

नवीन जोडपे म्हणून डॉ.पृथ्वीराज वाघ, डॉ.अक्षायनी कोकाटे यांचा तर पत्रकार राहुल मराठे व नयना मराठे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम शासनाचे नियम व अटींचे पालन करून साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.