चेन्नईचा राजस्थानवर ४ गडी राखून विजय

0

जयपूर :- आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील एक अत्यंत रोमांचक सामना प्रेक्षकांनी अनुभवला. चेन्नईने राजस्थानकडून विजय अक्षरश: खेचून आणला. अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी तब्बल १८ धावा आवश्यक आणि धोनीची पडलेली विकेटही राजस्थानला तारू शकली नाही. चेन्नईने राजस्थानवर ४ गडी राखून विजय मिळवला. अंबाती रायुडू आणि एम. एस. धोनी चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

राजस्थानने विजयासाठी दिलेलं 152 धावांचं आव्हान चेन्नईने अखेरच्या षटकात पूर्ण करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.