ट्रॅक्टरचे फाटक तुटल्याने महामार्गावर कांदा विखुरला : शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

0

जळगाव ;– शहरातील अजिंठा चौफुलेजवळ  ममता हाँस्पिटल समोर ट्रॅक्टर मध्ये जळगाव तालुक्यातील भादली येथील नरेंद्र माधव कोल्हे हे शेतकरी कांदा घेऊन जात असतांना अचानक ट्रॅक्टरचे मागचे फाटक तुटल्याने नँशनल हायवे ६ वर कांदाच कांदा झाला.  यामुळे  महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

भादली येथील शेतकरी नरेंद्र कोल्हे यांनी आपल्या शेतातील कांदा काडून तो शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन येथे एम.एच.१९ पी. ४७२१ या क्रमांकाच्या  ट्रॅक्टरने नेत असतांना फाटक तुटल्याचीघटना आज सायकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.  याठिकाणी आजुबाजुला असणाऱ्या नागरिकांनी कांदा हायवेवरील कांदा बाजुला केला. वाहतूक पोलिसांनी  वाहतूक सुरळीत केली अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनीही मदतीचा हात दिला.  यामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.